Tuesday, December 13, 2011

ही क्रूर थट्टा का गं ? - ."©मंदार खरे"!!! (वही थिस कोलावेरी दी)

ही क्रूर थट्टा का गं ?

किती दूर चंद्र
चंद्र रंग श्‍वेत
पाठी मागे रात्र
रात्रीचा रंग काळा
ही क्रूर थट्टा का गं?

गौर वर्ण मुलगी
मुलीचे ह्र्दय काळं
डोळ्यांची नजरा नजर
माझे भविष्य अंध:कार
ही क्रूर थट्टा का गं?

हातामध्ये मदिरेचा प्याला
डोळ्यांमध्ये अश्रु तुडुंब
रित्या आयुष्यात मुलगी येते
आयुष्याची गाडी ऊलटी फिरते
प्रिये अग माझ्या प्रिये

मला आता ऐकायचे आहे
देवा! मी त्यासाठी मरत आहे
ती आता खुश आहे

ही कविता लाजाळू मुलांची आहे
आम्हाला पर्यायच नाही आहे

ही कविता खुप रद्द्ड आहे

मंदार खरे
४/१२/१२