ही क्रूर थट्टा का गं ?
किती दूर चंद्र
चंद्र रंग श्वेत
पाठी मागे रात्र
रात्रीचा रंग काळा
ही क्रूर थट्टा का गं?
गौर वर्ण मुलगी
मुलीचे ह्र्दय काळं
डोळ्यांची नजरा नजर
माझे भविष्य अंध:कार
ही क्रूर थट्टा का गं?
हातामध्ये मदिरेचा प्याला
डोळ्यांमध्ये अश्रु तुडुंब
रित्या आयुष्यात मुलगी येते
आयुष्याची गाडी ऊलटी फिरते
प्रिये अग माझ्या प्रिये
मला आता ऐकायचे आहे
देवा! मी त्यासाठी मरत आहे
ती आता खुश आहे
ही कविता लाजाळू मुलांची आहे
आम्हाला पर्यायच नाही आहे
ही कविता खुप रद्द्ड आहे
मंदार खरे
४/१२/१२
Tuesday, December 13, 2011
Saturday, January 1, 2011
नववर्ष आले हो नववर्ष आले........© मंदार खरे!!!
नववर्ष आले हो नववर्ष आले..
गतवर्षी झाले बहु चर्चित घोटाळे
पुण्य संस्कृतीचे झाले पार वाटोळे
कांद्याने केले सगळ्यांचे वांदे
उघड झाले "आदर्श" धंदे
"राष्ट्र्कुल"चा खाली आला पुल
दुरसंचारने केला "स्पेक्ट्र्म"च गुल
"B.R.T."चे वाजले तीन तेरा
अतिवृष्टीने बुडविले भुमिधरा
"लवासा"ने खाल्ले पुण्याचे डोंगर
"जैतापूर"ने फिरवले कोकणावर नांगर
"वाईटा" बरोबर काही "चांगले"ही घडले
वर्ष सरता सरता "बॅलन्स"ही केले
"वनडे"त मारले सचिनने दोनशे
"कसोटी"त राखला नंबर वन शानसे
"हरीश्चंद्रा"ची झाली "ऑस्कर"वारी
"साईना" ने मारली ऊंच भरारी
"निकोल" बनली "पृथ्वी-सुंदरी"
"ओबामा" आले "भारता"च्या दारी
गतवर्षीचे आता पुरे झाले ऊणे देणे
सुख, समृद्धी, शांति हेच जीवन गाणे
©मंदार खरे
१/१/११
गतवर्षी झाले बहु चर्चित घोटाळे
पुण्य संस्कृतीचे झाले पार वाटोळे
कांद्याने केले सगळ्यांचे वांदे
उघड झाले "आदर्श" धंदे
"राष्ट्र्कुल"चा खाली आला पुल
दुरसंचारने केला "स्पेक्ट्र्म"च गुल
"B.R.T."चे वाजले तीन तेरा
अतिवृष्टीने बुडविले भुमिधरा
"लवासा"ने खाल्ले पुण्याचे डोंगर
"जैतापूर"ने फिरवले कोकणावर नांगर
"वाईटा" बरोबर काही "चांगले"ही घडले
वर्ष सरता सरता "बॅलन्स"ही केले
"वनडे"त मारले सचिनने दोनशे
"कसोटी"त राखला नंबर वन शानसे
"हरीश्चंद्रा"ची झाली "ऑस्कर"वारी
"साईना" ने मारली ऊंच भरारी
"निकोल" बनली "पृथ्वी-सुंदरी"
"ओबामा" आले "भारता"च्या दारी
गतवर्षीचे आता पुरे झाले ऊणे देणे
सुख, समृद्धी, शांति हेच जीवन गाणे
©मंदार खरे
१/१/११
Tuesday, November 3, 2009
Manacha Aarsa
प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणीँनो
माझ्या पहिल्या ब्लॉग मधे तुमचे स्वागत आहे!
नावा प्रमाणे माझ्या ब्लॉगवर मी तुम्हाला मनाचा आरसा दाखावंयाचा किंवा लिहायचा प्रयत्न करणार आहे।
त्याच प्रमाणे तुम्हाला सुध्हा एखादा प्रसंग आठवण नुसते मन जरी मोकळे करायचे असेल तर बिनधास्त मला लिहा
तुमचा
मन्या
माझ्या पहिल्या ब्लॉग मधे तुमचे स्वागत आहे!
नावा प्रमाणे माझ्या ब्लॉगवर मी तुम्हाला मनाचा आरसा दाखावंयाचा किंवा लिहायचा प्रयत्न करणार आहे।
त्याच प्रमाणे तुम्हाला सुध्हा एखादा प्रसंग आठवण नुसते मन जरी मोकळे करायचे असेल तर बिनधास्त मला लिहा
तुमचा
मन्या
Subscribe to:
Posts (Atom)